Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘कोकणातील आंब्यावरील नैसर्गिक आपत्तीचा योग्य अहवाल सादर करा’; पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्यांच्या झाडांना मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात सातत्याने कमी असणारे तापमान व थंड वातावरणामुळे त्यावर चांगला मोहोर आला. त्याचप्रमाणे आता तिसरा मोहोर आल्यानंतर त्यातून किती उत्पन्न आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल, याचा अंदाज नाही. त्यामुळे कृषी विभागाने योग्य अहवाल तयार करून तो शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्यावर आलेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उप कुलगुरू  संजय भावे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संशोधन संचालक डॉ.वी.यू.शहारे, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ विभागाच्या विभागप्रमुख  डॉ.पुष्पा पाटील, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय देसाई, कृषी विभागाचे अवर सचिव डॉ. ललितकुमार धायगुडे तसेच आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, आंबा बागायदार व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  मुळा डाव्या उजव्या कालव्याचे 23 फेब्रुवारी पासून आवर्तन; मंत्री विखे पाटील यांचा निर्णय

कोकणातील आंबा पिकांवर मोहोर आला नसल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर, पुढील काळात जर पाऊस आला किंवा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली तर आंबा उत्पादकांच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे आंबा उत्पादकांना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल, असा विश्वास मंत्री श्री.राणे यांनी आंबा बागायतदारांना दिला.

आंबा पिकांवर वेगवेगळी किटकनाशके फवारणी केल्याने उत्पादनात घट होते. यासाठी धोरण ठरविण्याचीही गरज पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केली. कृषी विद्यापीठे सक्षम करण्यावर अधिक भर देण्यात येण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील आंब्यांच्या उत्पादनात अधिक प्रमाणात वाढ व्हावी, यासाठी परदेशी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखविली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button