Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

दिवट्या आमदार, शरम वाटली पाहिजे; शरद पवारांकडून आमदार टिंगरेंचा समाचार

पुणे | पुण्यातील कल्याणीनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. ड्रंक अँन्ड रन प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटकही करण्यात आली. परंतु, या प्रकरणात अल्पवयीन चालकाला वाचवण्याचा प्रयत्न वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याचा आरोप झाला. या प्रकरणावरून शरद पवार यांनी आमदार टिंगरे यांच्यावर टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले, पाऊस आला म्हणून पंतप्रधांनांनी पुण्यातील सभा रद्द केली. पण आम्ही ठरवलंकी पाऊल आला तरी सभा घ्यायचीच. पुण्याचं वैशिष्ट्य काय तर कोयगा गँग. पुण्याची ओळख बजाजचा कारखाना हे पुण्याचं वैशिष्ट्यं होतं, किर्लोस्करांचा कारखाना पुण्याचं वैशिष्ट्यं होतं, पुणे विद्येचे माहेरघर होतं. आणि आता कोयता गँग हे पुण्याचं वैशिष्ट्य झालंय.

हेही वाचा   –    मुंबई विद्यापीठावर भगवा फडकला, युवासेनेचा सर्व १० जागांवर विजय 

सुनील टिंगरे तू कुणाच्या पक्षातून निवडून आलास? हा पक्ष कोणी काढला सगळ्या हिंदुस्थानला माहितीये. त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली. तू सोडून गेला ते ठिकाय. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू, दोन तरुण मुलांना त्यांनी उडवलं काय, जागच्या जागी त्यांची हत्या काय होते, अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवट्या आमदार पोलीस ठाण्यात जातो आणि चालकाला वाचवतो. यासाठी मते मागितली होती? मतं राष्ट्रवादीच्या नावाने मागितली. शरद पवारांच्या नावाने मतं मागितली. आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्याचं उत्तरदायित्व या पद्धतीने केलं, असं शरद पवार म्हणाले.

मागील वेळी लोकसभेला आम्हाला फक्त चार आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. पण मी निर्धार केला की विधानसभेला आपण हे चित्र बदलायचे आणि लोक उभे राहिले. आता तर लोकसभेला आपण ३१ जागा जिंकल्यात. मोदी म्हणतात की कुटुंबासाठी विरोधक राजकारण करतात. पण या लोकांचं योगदान नाही का? जवाहरलाल नेहरू १४ वर्षे तुरुंगात होते. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यांची हत्या झाली. राजीव गांधींनी नवीन तंत्रज्ञान आणले. त्यांची हत्या झाली. ही साधीसुधी माणसे नव्हती आणि नरेंद्र मोदी विचारतात की यांनी काय केले? असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button