क्रिडाताज्या घडामोडी
क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ मुशीर खान यांचा अपघात
मुशीर खान याची मुंबई संघात इराणी ट्रॉफीसाठी निवड झाली
कानपूर : भारतीय क्रिकेट वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटर सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान यांचा रस्ते अपघात झाल्याच माहिती समोर आली आहे. या अपघातात मुशीर खान याच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मुशीर खान ईराणी कप सामन्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुशीर खान आणि त्याचे कोच वडील नौशाद खान हे कानपूरवरुन लखनऊला जात होते. या दरम्यान अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.
मुशीर या सामन्यासाठी वडिलांसह लखनऊला जात होता. तेव्हा हा अपघात झाला. मुशीर खानची ईराणी ट्रॉफीसाठी मुंबईकडून निवड झाली आहे. ईराणी ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.





