प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांनी दाखवला देशभक्तीचा आणि कौशल्यांचा उत्साह

पिंपरी-चिंचवड | चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बँड पथकासह प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषा परिधान करून पथसंचलन केले आणि प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत उपस्थितांचे मन जिंकले.
ध्वजारोहण जगविख्यात कला समूह, पुणे चे संस्थापक मनोज कुमार फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आले, तर त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी केला. यावेळी संस्थेचे खजिनदार डॉ. भूपाली शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, डॉ. पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, उपमुख्याध्यापिका लीजा सोजू आणि शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रातील गुणवंत प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्याचे सादरीकरण केले.
हेही वाचा : डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

प्रमुख पाहुणे मनोज कुमार फुटाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि दृढनिश्चय बाळगून अभ्यासाबरोबर इतर कौशल्य आत्मसात करा. येणाऱ्या अडचणींवर मात करत आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी व्हा. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून साकार करावी.”
संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “आपली विवेकबुद्धी जागृत ठेवा, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा आणि समाजात सहभाग घेऊन विकसित भारताच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणा.”
ध्वजारोहण समारंभाचे संयोजन डॉ. आनंद लुंकड, डॉ. शबाना शेख, प्रा. पांडुरंग इंगळे, डॉ. अभय पोद्दार व संदीप शहा यांनी केले, तर विद्यार्थ्यांचे पथसंचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृंदा जोशी, उपमुख्याध्यापिका लीजा सोजू आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता डिंगणकर यांनी केले.
“विद्यार्थ्यांनो, आपल्या विवेकबुद्धीला जागृत ठेवा, ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहात त्यात प्रावीण्य मिळवा आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून समाजाच्या विकासात मोलाचे योगदान द्या.”
– मनोज कुमार फुटाणे.




