Breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

ओएनजीसी, बेतुल गोवा येथे India Energy Week 2026 चे उद्घाटन

स्वच्छ ऊर्जा भारताच्या शाश्वत विकासाचा केंद्रबिंदू ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०५० पर्यंत १००% नवीकरणीय ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी गोव्याकडून स्वच्छ ऊर्जा रोडमॅप निश्चित: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी | भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा अधिक बळकट करत दक्षिण गोव्यातील ओएनजीसी बेतुल येथे India Energy Week (IEW) 2026 चे उद्घाटन करण्यात आले. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संरक्षणाखाली आयोजित या चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय मंचात ऊर्जा संक्रमण, ऊर्जा सुरक्षा, तांत्रिक नवकल्पना आणि शाश्वत आर्थिक विकास यावर चर्चा व मार्गदर्शन केले जात आहे.

या जागतिक स्तरावरील कार्यक्रमात ७५,००० हून अधिक ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक, ७०० प्रदर्शक, ११ विषयक विभाग (थीमॅटिक झोन) आणि ९ हून अधिक देशांचे पॅव्हिलियन सहभागी झाले असून India Energy Week हा जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा क्षेत्रातील परिषदांपैकी एक ठरत आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उच्चस्तरीय परिषद, तंत्रज्ञान प्रदर्शन आणि धोरणात्मक नेटवर्किंग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल माध्यमातून कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सांगितले की स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा भारताच्या भविष्यातील विकासाचा प्रमुख आधारस्तंभ ठरेल. ते म्हणाले, “India Energy Week हे जागतिक ऊर्जा संवादाचे प्रभावी व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे, जे शाश्वतता, नवकल्पना आणि ऊर्जा सुरक्षेतील भारताचे वाढते नेतृत्व दर्शवते.”

हेही वाचा        :        प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की ‘विकसित भारत’ साध्य करण्यासाठी विश्वासार्ह, परवडणारी आणि सक्षम ऊर्जा व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. गोवा हा राष्ट्रीय दृष्टिकोन पूर्णतः सामायिक करीत असून शाश्वत विकास आणि भविष्याभिमुख पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ‘विकसित गोवा’ घडविण्यास कटिबद्ध आहे.

ते पुढे म्हणाले, “२०५० पर्यंत १०० टक्के नवीकरणीय ऊर्जेकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने गोव्याने स्वच्छ ऊर्जा रोडमॅप निश्चित केला आहे. व्यापक आंतरराष्ट्रीय सहभाग आणि उद्योग क्षेत्राची भक्कम उपस्थिती असलेले India Energy Week 2026 हे पर्यटन सेवा, स्थानिक उद्योजक आणि रोजगारनिर्मितीस चालना देत प्रादेशिक विकासाला थेट हातभार लावेल.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “हा कार्यक्रम केवळ परिषद सभागृहांतील चर्चांपुरता मर्यादित नसून, त्यापलीकडे जाऊन स्थानिक समुदायासाठी संधी निर्माण करतो आणि हरित (Green) व सागरी (Blue) अर्थव्यवस्थेतील संवाद व विकासासाठी गोव्याला जागतिक व्यासपीठ म्हणून अधिक बळकट करतो. किनारी राज्य म्हणून गोवा हरित आणि निळ्या अर्थव्यवस्थेच्या पुढाकारासाठी कटिबद्ध आहे.”

या उद्घाटन कार्यक्रमास केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीपसिंग पुरी, संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग व प्रगत तंत्रज्ञान मंत्री तसेच ADNOC चे व्यवस्थापकीय संचालक व समूह CEO मा. डॉ. सुलतान अहमद अल जाबेर, कॅनडाचे ऊर्जा व नैसर्गिक संसाधन मंत्री श्री टिमोथी हॉजसन, तसेच १२० हून अधिक देशांतील प्रतिनिधी आणि जगभरातील ५५० पेक्षा अधिक वक्ते उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button