Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शंभूराज देसाईंचा ‘पाटण पॅटर्न’ आता जिल्हाभर; अधिकारीच येणार तुमच्या दारी

सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघात सामान्य नागरिकांच्या कामाची जागेवर सोडवणूक व्हावी याकरिता प्रायोगिक तत्त्वावर पालकमंत्री आपल्या दारी ही योजना राबविण्यात आली होती. गेल्या चार महिन्यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून 2127 लोकांच्या विविध तक्रारींचा जागेवर निपटारा करण्यात आलेला आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संपूर्ण सातारा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन ही योजना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, राज्य सरकारच्या काही महत्त्वपूर्ण महत्त्वकांक्षी योजनेपैकी सातार्‍यात ही योजना पहिल्यांदाच राबवण्यात आली.

या योजनेसाठी स्वतंत्र एजन्सी नेमून त्यामध्ये एक संचालक आणि चार सहाय्यक यांना लॅपटॉप आणि आधुनिक असे मोबाईल संच देण्यात आले आहेत. पाटण तालुक्यातील रोज प्रत्येकी दोन ते तीन गावांमध्ये या पथकाने जाऊन नागरिकांच्या पाणीपुरवठा, पाणंद रस्ते, महसूल तसेच पायाभूत सुविधांचे प्रश्न यांचा आढावा घेऊन त्याचा पंचायत समिती ग्रामपंचायत तसेच संबंधित कार्यक्षेत्रातील प्रांत कार्यालयाकडे पाठपुरावा करून त्या समस्या सोडविल्या आहेत.

हेही वाचा –  ‘नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यामुळे नागरिकांचा संबंधित शासकीय कार्यालयाकडे जाण्याचा वेळ आणि पैसा वाचलेला आहे. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी लवकरच जिल्हाधिकार्‍यांबरोबर याबाबतची बैठक घेऊन या योजनेचा जिल्हाव्यापी आराखडा कसा राबवायचा, तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय या योजनेची अंमलबजावणी कशी करावयाची, याबाबत महायुतीच्या सर्व आमदारांशी चर्चा करून ही योजना लवकरच लागू केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांना वाईचे उपजिल्हाप्रमुख व नगराध्यक्ष पदाचे शिंदे गटाचे उमेदवार विकास शिंदे यांनी घेतलेल्या माघारी संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, शिंदे यांची पक्षाला विश्वासात न घेता परस्पर अर्ज माघारी घेणे ही प्रक्रिया धोरणाशीच विसंगत आहे. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे झालेली कारवाई ही योग्यच असल्याचा स्पष्ट निर्वाळा देसाई यांनी दिला.

तसेच महायुतीचा फॉर्म्युला सातारा जिल्ह्यात राबवला गेला नाही, सातारा शहरात महायुती झाली नाही, यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, महायुतीची समन्वय बैठक मीच पालकमंत्री या नात्याने शासकीय विश्रामगृहात घेतली होती. भाजपच्या सर्व मान्यवर मंत्र्यांची वेळ घेण्याच्या संदर्भाने मी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांना विनंती केली होती. मात्र त्यांच्याकडून मला काहीही पाठपुरावा आला नाही.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातार्‍यात शिवसेना शिंदे गटाकडून कोणताही प्रतिसाद नसल्याचे पत्रकारांना सांगितले या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, खरी परिस्थिती काय याचा खुलासा स्वतः जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी करावा. माझ्याकडून विचारणा झाली होती. मात्र त्यांच्याकडूनच काही उत्तर आले नाही, असे देसाई यांनी स्पष्टपणे सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button