Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुढील ३ दिवस राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा इशारा

पुणे : राज्यात कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार असून, किमान व कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे.

समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. परिणामी पुणे, अहिल्यानगर, जळगांव जिल्ह्यात आलेली थंडीची लाट ओसरली. काही जिल्ह्यांमध्ये तर किमान तापमान १४ ते १५ अंशावर पोहचले आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील किमान तापमानातही दोन ते तीन अंशाने वाढ झाली आहे.

हेही वाचा –  शंभूराज देसाईंचा ‘पाटण पॅटर्न’ आता जिल्हाभर; अधिकारीच येणार तुमच्या दारी

शनिवारी (दि. २२) जळगांव येथे सर्वात कमी ११ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. अन्य जिल्ह्यातील १० ते ११ अंशावर असलेले किमान तापमान १३ ते १५ अंशावर पोहचले आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील किमान तापमान

जळगांव ११, वाशिम ११.८, बीड १२.१, यवतमाळ १२.५, गोंदिया १२.६, अमरावती १३.१, मालेगांव १३.२, अहिल्यानगर १३.४, अकोला आणि नागपूर १३.५, नाशिक १३.८, वर्धा १४.२, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर १४.४, परभणी १४.५, बुलढाणा १५, चंद्रपूर १५.६, महाबळेश्वर १५.७,

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button