Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत’; संजय राऊत यांची कदमांवर टीका

मुंबई | स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली, ती घटना कुठलीही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळे घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळ आसपास दहा ते पंधरा लोकं आजू बाजूला उपस्थित होते. पण कोणालाही शंका आली नाही, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, की पुणे पोलिसांनी आणि सरकारने आरोपीला अटक केलं म्हणजे फार उपकार केले नाहीत. स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडते आणि त्या घटनेवर बोलताना गृहराज्यमंत्री काय बोलतात? ते म्हणाले की सर्व घटना शांततेत घडल्यामुळे बाहेर काही कळलं नाही. गृहराज्यमंत्र्यांची ही अशी भूमिका? एका मुलीवर बलात्काराची घटना घडते आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की तिने फोर्सफुली किंवा स्ट्रगल केलं नाही. अशा पद्धतीचा शब्द त्यांनी वापरला. खरं म्हणजे आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत.

हेही वाचा  :  इस्लामिक राष्ट्राची पेरणी : काय आहे वक्फ बोर्ड? महाराष्ट्रात कधी झाली वक्फची स्थापना? वाचा! 

पुण्यात अशा गोष्टी का घडतायेत? कायद्याचा धाक राहिला आहे का? पोलिसांची भिती राहिली आहे असं दिसत नाही. राजकीय वरदहस्त लाभलेले गुन्हेगार मोकाट सुटतात, जे गुन्हेगार असतात त्यांना कोणताही पक्ष नसतो. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ठाण्यातील बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेत जेव्हा अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला तेव्हा निवडणुका होत्या, आता निवडणुका नाहीत. तो ठाणे जिल्हा होता, आता पुणे जिल्हा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक, फार मोठे लेखक, फार मोठे कवी, फार मोठे संत आहेत. यापेक्षा अजून काही पदवी द्यायची असेल तर देऊ. एकनाथ शिंदे अशा पदव्या विकत घेऊ शकतात. आमदार आणि खासदार जसे विकत घेतले जातात त्या प्रकारे साहित्यिक, लेखक, कवी या पदव्या जर एकनाथ शिंदेंना हव्या असतील तर ते त्या पदव्या विकत घेऊ शकतात. एकनाथ शिंदे यांना अमित शाह अजून पुरस्कार देऊ शकतात. एवढंच नाही तर ते एकनाथ शिंदेंना ज्ञानपीठ पुरस्कार देखील देऊ शकतात, असंही संजय राऊत म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button