Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘एकदम ओक्के!’ सर्वांनी एकटं पाडलं, पण शहाजीबापूंनी सांगोल्याचे मैदान मारलं

Shahajibapu Patil | सांगोला नगर पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेचे १२ नगरसेवक विजयी झाले असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांनीही विजय संपादन केला आहे. त्यामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे.

या निवडणुकीत भाजपा, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आघाडीचे नेतृत्व केले. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली होती. निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभाही सांगोल्यात पार पडल्या होत्या. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप आणि विकासकामांवरून टीका झाली होती.

हेही वाचा     :          ‘माझ्यावर वारंवार बलात्कार झाला, मला न्याय द्या’; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानची मोदी–शहांकडे मागणी

सुरुवातीला भाजपा–शेकाप युतीची बाजू मजबूत दिसत होती. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. निवडणूक काळात पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाचे छापे पडल्याने वातावरण अधिक तापले होते.

या निवडणुकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील एकटे पडल्याचे चित्र असल्याची चर्चा होती. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकापसोबत युती करत निवडणूक लढवली होती. याबाबत पाटील यांनीही अनेक वेळा आपण एकटे पडलो असल्याचे वक्तव्य केले होते. अखेरीस, मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याने सांगोला नगर पंचायतवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button