Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

‘माझ्यावर वारंवार बलात्कार झाला, मला न्याय द्या’; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानची मोदी–शहांकडे मागणी

Haseen Mastan | मुंबईतील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान यांची मुलगी हसीन मस्तान मिर्झा हिने आपल्यावर बलात्कार, जबरदस्तीने लग्न, हत्येचा प्रयत्न तसेच मालमत्ता हडप करण्याचे गंभीर आरोप करत न्यायासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मदत मागितली आहे.

हसीन मस्तान मिर्झा हिने १९९६ साली आपण अल्पवयीन असताना मामाच्या मुलाशी जबरदस्तीने लग्न लावण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्याच व्यक्तीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला, शारीरिक व मानसिक छळ केला आणि आपल्या ओळखीचा गैरवापर करून मालमत्ता हडप केल्याचेही तिने म्हटले आहे. आरोपी पुरुषाने यापूर्वी आठ वेळा लग्न केले होते, असा दावाही तिने केला आहे.

हेही वाचा     :          “भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल”, शिंदे गटाच्या मंत्र्याचे मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच केलेले व्यक्तव्य चर्चेत

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हसीन म्हणाली, “जेव्हा माझ्यासोबत हे सगळे घडले, तेव्हा मी फारच लहान होते. मला कोणताही आधार मिळाला नाही. माझ्यावर बलात्कार झाला, माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला, बालविवाहासाठी भाग पाडले गेले आणि माझी मालमत्ता हिसकावून घेण्यात आली.” या छळामुळे आपण तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही तिने सांगितले.

न्यायासाठी अनेक वर्षे प्रयत्न करूनही अद्याप दिलासा न मिळाल्याचे हसीनने नमूद केले. नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओनंतर तिने पुन्हा एकदा मदतीची मागणी केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी सरकारने आणलेल्या तिहेरी तलाकविरोधी कायद्याचे हसीनने कौतुक केले. हा कायदा महिलांसाठी महत्त्वाचा आणि योग्य पाऊल असल्याचे सांगत, इस्लाममध्ये तिहेरी तलाकचा गैरवापर होत असल्याचा आरोप तिने केला. लैंगिक गुन्हे आणि जबरदस्ती विवाहाच्या प्रकरणांमध्ये त्वरित न्याय मिळावा यासाठी अधिक कठोर कायदे करण्याची मागणीही तिने केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button