Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘उद्धव ठाकरेंचा आदेश, राऊत म्हणाले, मनोहर जोशींचं घर जाळून टाका’; सदा सरवणकर यांचा मोठा आरोप

मुंबई : शिवसेना शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे, राऊतांच्या आदेशानंच मनोहर जोशींचं घर जाळल्यास सांगितलं, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

सदा सरवणकर म्हणाले, मला संजय राऊतांचा फोन आला. तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की, तुम्ही कुठे चालले? मला वाटलं मी मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चाललो आहे ते राऊतांना कशाला सांगायचं. ते मला म्हणाले की, तू मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चालला आहेस ना. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, उद्धव ठाकरेंकडून किंवा मातोश्रीवरून राऊतांनी याबाबत कुणीतरी सांगितलं असावं.

हेही वाचा – ‘शिवसेनेची स्थापना कमळाबाईला..’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

राऊतांनी मला मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चाललो आहे का विचारल्यावर मी हो चाललो आहे सर असं उत्तर दिलं. त्यावर ते म्हणाले की, असाच जाऊ नकोस. जाऊन मनोहर जोशींचं घर जाळून टाक. काही शिल्लक ठेऊ नकोस. बाजूला पेट्रोल पंप आहे. तिथून पेट्रोल घ्या आणि घराला आग लावून टाका, असं सदा सरवणकर म्हणाले.

दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे प्रतिक्रिया दिली आहे. सदा सरवणकरांना काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारांमध्ये गेल्यावर असं २०-२५ वर्षांनी सांगत आहेत. त्याचवेळी सांगितलं असतं, तर बरं झालं असतं, असं अंबादास दानवे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button