रूपाली चाकणकर यांचा फोटो अश्लील वेबसाईटवर अपलोड, संबंधित पेजवर गुन्हा दाखल

पुणे : राज्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा फोटो अश्लील वेबसाईटवर अपलोड करण्यात आला. याबाबतची माहिती समजताच त्यांनी पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संबंधित पेजवर गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.
सोशल मीडियावरील एका पेजवर काही महिलांचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत, त्याच पेजवर रूपाली चाकणकरांचेही फोटो आढळून आला. यासंबंधित माहिती मिळताच या प्रकरणी सायबर सेलने गुन्हा दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे. चार दिवसांपूर्वीच अज्ञात व्यक्तींनी हे फोटो अपलोड केले आहेत.
हेही वाचा – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
रुपाली चाकणकर यांनी सायबर सेलचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्याकडे एक रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ते संशयितांचा शोध घेत आहेत.





