breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखान करून गलिच्छ प्रचार करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाइटविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांच्या विरोधात आज संध्याकाळपर्यंत कारवाई न झाल्यास उद्या मी स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन याविरोधात कारवाई करण्याचा आग्रह धरणार आहे आणि जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत तिथे ठिय्या मांडणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेतील तफावत पूर्ववत करा: आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप

छगन भुजबळ म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषम करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ठ प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे.

एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरश: इतिहासाची तोडमोड सुरू आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. तरी, सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी, असं छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button