मोहन भागवत यांना पंतप्रधान मोदीं इतकी सुरक्षा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांत्या इतकीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मात्र अचानक सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने त्यांना कुठला धोका आहे अशी भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवतांना आधी झेड प्लस सुरक्षा होती, त्यात वाढ करून एडवान्स सिक्युरिटी लाइजन पर्यंत करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही इतकीच सुरक्षा दिली जात आहे.
हेही वाचा – काँग्रेस प्रवक्ते अलोक शर्मांची जीभ घसरली… : म्हणाले ‘‘मराठी लोक बलात्कारी’’!
एएसएल सुरक्षेत काय काय असते?
एएसएल अंतर्गत संरक्षण देणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेशी संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि या स्तरावरील इतर विभागांचा सहभाग अनिवार्य आहे. यात बहुस्तरीय सुरक्षा घेरासह तोडफोडविरोधी तपासाचा समावेश आहे. हेलिकॉप्टर प्रवासाला केवळ खास डिझाइन केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये परवानगी दिली जाईल आणि ते ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार चालतील.