Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात अडकलेल्या स्पर्धा परीक्षेच्या १६ विद्यार्थ्यांचा मूळगावी जाण्याचा मार्ग मोकळा

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

दीड महिन्यापासून पुण्यात अडकलेल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यार्‍या 16 विद्यार्थ्यांना नगर येथे आपल्या गावी जाण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली. त्यानुसार एसटीच्या स्वारगेट आगारातून एक बस गुरूवारी दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेवून नगरसाठी रवाना झाली.

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिक, विद्यार्थी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. शहरात सर्वच बंद असल्यामुळे त्यांचे जेवणाचे हाल होत होते. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणली असून परराज्यातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना काही अटींवर परतण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात राजस्थानमध्ये अडकलेल्या 74 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने धुळे येथून गाड्या पाठवून पुन्हा महाराष्ट्रात आणले होते.

त्या पार्श्वभुमीवर पुणे शहरात अडकलेल्या नगर येथील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या 16 विद्यार्थ्यांना नगरला जाण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली. त्याकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे येथील स्वारगेट आगारातून बस उपलब्ध करून देण्यात आली होती. गुरूवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास एसटी बस विद्यार्थ्यांना घेवून नगरच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती, एसटी प्रशासनाने दिली

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button