काँग्रेस प्रवक्ते अलोक शर्मांची जीभ घसरली… : म्हणाले ‘‘मराठी लोक बलात्कारी’’!
सोशल मीडियावर महाराष्ट्रभरात संताप : राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी
मुंबई: काँग्रेस नेते आलोक शर्मा अडचणीत सापडले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान, शर्मा यांनी मराठी लोकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन सुरु असलेल्या चर्चेत शर्मा सहभागी झाले होते. भाजपच्या दुसऱ्या नेत्या उत्तर देताना शर्मांची जीभ घसरली.
‘‘मराठी लोक बलात्कारी…’’ असा उल्लेख शार्मा यांनी केल्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. अलोक शर्मा यांनी मराठी लोकांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मिडियावर शर्मा यांच्या नेटकऱ्यांकडून निषेध केला जात आहे. भाजप आणि शिवसेनेने शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, तर केंद्रीय मंत्री पियुष गोएल यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
शिवसेनेने शर्मा यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांनी मराठी माणसाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
समाज माध्यमांवर आलोक शर्मांच्या वक्तव्यावरुन संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी शर्मांचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी मराठी लोकांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. तसेच, माफी मागण्याची मागणी केली आहे.
https://x.com/Shivsenaofc/status/1827006862019154061





