Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे’; रामदास आठवलेंचा राष्ट्रवादीला टोला

शरद पवार यांनी एनडीएसोबत यायला हवे

सांगली : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. दरम्यान, राज्यात सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

रामदास आठवले म्हणाले की, भावी मुख्यमंत्री म्हणून होत असलेली फलकबाजी हास्यास्पद असून मलाही मुख्यमंत्री व्हावे असं वाटत आहे. मात्र, त्यासाठी आपली ताकद असेल तरच हे शक्य आहे.

सद्यस्थितीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना त्यांच्या गटातून संधी मिळेल असे वाटत नाही. आम्हालाही त्यांची आवश्यकता नाही. अजितदादा व सुप्रियाताई यांच्यात सध्या चढाओढ सुरू आहे. मात्र, जोपर्यंत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत अन्य कोणाला संधी मिळेल असे वाटत नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचे सांगितले आहे. त्यांनी आता ठोस निर्णय घेउन एनडीएसोबत यायला हवे. ते जेष्ठ व अनुभवी नेते आहेत. मी आता एनडीएसोबत आहे, मग पवार यांनीही यायला हरकत कसली? त्यांनीच आता ठोस भूमिका घ्यावी, असं रामदास आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरे आपले मित्र आहेत, तसेच ते सुसंस्कृत आहेत. त्यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ४० आमदारांवर होत असलेली जहरी टीका अमान्य आहे. त्यांनी बोलताना भान ठेवून बोलण्याची गरज आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button