‘येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त कायदा संमत होणार’; राधाकृष्ण विखे पाटील
![Radhakrishna Vikhe Patil said that the Lokayukta Act will be passed in the coming winter session](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Radhakrishna-Vikhe-Patil-780x470.jpg)
मुंबई : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. येत्या अधिवेशनामध्ये लोकायुक्त कायदा संमत करण्यासंदर्भामध्ये अण्णा हजारे यांच्याशी विखे पाटील यांनी चर्चा केली आहे. लोकायुक्त सक्षम करण्यासाठी जी समिती नेमण्यात आलेली आहे, त्या समितीच्या अध्यक्षपदी विखे पाटील आहेत. विधानसभेमध्ये हा कायदा मंजूर झाला असून, सध्या विधान परिषदेमध्ये चर्चेसाठी आहे. सुधारित कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील घेण्याबाबत चर्चा झाल्याचं विषय विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधेयक मंजूर न झाल्यास अध्यादेश काढण्यासंदर्भात देखील सरकार विचार करत असल्याचं विखे पाटील म्हणाले.लोकायुक्त कायद्याबाबत सरकार वेळकाढूपणा करत नसून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा कायदा विधानसभेमध्ये मंजूर झाला आहे. मात्र विधान परिषदेमध्ये संख्याबळ कमी असल्याने विरोधकांच्या विरोधामुळं हा कायदा तिथे संमत झाला नाही असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
हेही वाचा – Hari Narke : ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लोकायुक्त विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. भेटीनंतर हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मंजूर करण्याबाबतचा शब्द विखे पाटील यांनी दिला असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं.