breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

Hari Narke : ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समजा परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील Asian Heart Hospital मध्ये ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. थोड्याच वेळात मंत्री छगन भुजबळ रूग्णालयात दाखल होणार आहेत.

महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून ते सुपरिचित होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा – ‘शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता, पण..’; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचं कार्य सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोवण्यात हरी नरके यांचा मोठा वाटा राहिला. याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र त्या आधीच त्यांची प्राण ज्योत मालवल्याने पुण्यातील साहित्य आणि डाव्या चळवळींच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button