Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘महिला सक्षमीकरण, शेतमालाला बाजारपेठ, युवा प्रशिक्षणास प्राधान्य देऊन जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव करावेत’; मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली  : जिल्हा वार्षिक योजनेतून महिलांचे सक्षमीकरण, शेतमालाला बाजारपेठ व युवकांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्धी हे लक्ष्य ठेवून संबंधित विभागांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामे प्रस्तावित करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजिता महापात्र, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात महिलांचे विशेषत: एकल महिलांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि युवा पिढीचे कौशल्य विकास व रोजगार उपलब्धी हे तीन घटक केंद्रस्थानी ठेवून जिल्हा वार्षिक योजनेतील कामे संबंधित विभागांनी प्रस्तावित करावीत. महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी तसेच युवा पिढीला उद्योग, सेवा व कौशल्याधारित क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगाराभिमुख उपक्रम आखावेत, असे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा –  ‘महाराष्ट्रात दंत आरोग्य व दंत पर्यटन क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याची क्षमता’; डॉ. राजेश गवांदे

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)चा आढावा घेत चालू आर्थिक वर्षातील प्रस्तावांच्या मंजुरीबाबत गतीने कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र, विविध कामांना युडीआय यासह जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रस्ताव, विभागनिहाय उद्दिष्टपूर्ती आणि योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शेतमालाला अधिक चांगली आणि व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेशी थेट जोडणी आणि शेतकरी उत्पादक संस्थांना (FPO) बळकटी देण्यासाठी आवश्यक बाबींवर भर देण्यात आला.

दरम्यान या बैठकीपूर्वी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका अंतर्गत विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने पावसाळापूर्व कामांची पूर्तता तसेच मालमत्ता कर आकारणीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. त्यावेळी महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी याबाबतची माहिती सादर केली. या बैठकीस महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील बांधकाम अभियंता पृथ्वीराज चव्हाण आदि उपस्थित होते.

यावेळी जागतिक बॅंकेकडील निधीतून प्रस्तावित कामे, सद्यस्थिती, जिल्हा वार्षिक योजनेतून रस्ते कामे, महापूर पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आदि बाबींचा आढावा घेण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button