Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वैद्यकीय अधिकार्‍यांची समुपदेशनाद्वारे पदोन्नती; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागात गट ‘ब’ संवर्गात कार्यरत असलेल्या १९० वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट ‘अ’ संवर्गात रिक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. ही पदोन्नती पारदर्शी, समुपदेशनाद्वारे करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला. राज्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आरोग्य विभागाने अत्यंत पारदर्शीपणे, समुपदेशनाद्वारे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पसंतीक्रमानुसार राज्यातील १९० वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे वरिष्ठ पदावरील रिक्त जागा तात्काळ भरल्या जातील. प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर सर्व रुग्णालयांतील कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. विशेषतः आदिवासी दुर्गम व ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होईल. या निर्णयामुळे दीर्घकाळ पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. वैद्यकीय सेवेवरही त्याचे सकारात्मक परिणाम होतील अशी अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-ब मध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी या संवर्गात स्वरूपात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा शासननिर्णय जारी झाला असून, शासननिर्णयातील अटी व शर्तींच्या अधीन राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांना नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा –  ‘विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी’; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

आरोग्यमंत्र्यांनी समुपदेशनाद्वारे पदोन्नती देण्याबाबत घेतलेल्या पारदर्शी व सकारात्मक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकारी संवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. आरोग्य विभागातील एक महत्त्वाचा प्रशासकीय प्रश्न मार्गी लागला आहे. विशेषत: दुर्गम, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जाते.

आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव दी. नी. केंद्रे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अवर सचिव वसंत गायकवाड, सहसंचालक राजेंद्र भालेराव, मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button