Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘मणिपूरला जायला वेळ नाही, सामना बघायला आहे’; प्रियंका गांधींची मोदींवर खोचक टीका

Priyanka Gandhi : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीस संघाचा पराभव झाला. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाव न घेता ‘पनौती’ असा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, अलिकडेच विश्वचषकामध्ये आपला संघ स्वत:च्या कष्टाने अंतिम सामन्यात पोहोचला. संघ जिंकला तर त्याचे श्रेय आपल्यालाही घेता येईल या विचाराने मोदी तिथे पोहोचले. मात्र हिंसाग्रस्त मणिपूरला ते गेले नाहीत. जिथे अभिमान आणि सन्मानाची बाब असते तिथे पंतप्रधान जातात पण संकटाच्या परिस्थितीपासून ते दूर राहतात अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – भारत-ऑस्टेलिया यांच्यात आज पहिला टी-२० सामना; पाहा संपुर्ण माहिती

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय झाल्यास त्याचे श्रेय घेण्यासाठी मोदी गेले होते. मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात तर मग त्यांच्या कार्यकाळात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष कसा झाला? पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार मोठया उद्योजकांचे कर्जे माफ करते पण गरिबांकडे दुर्लक्ष करते या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button