पंतप्रधान यांचा ‘डोमिनिका अवार्ड ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान
कठीण काळात भारताने केलेली मदत लक्षात घेत सन्मान केला
डोमिनिका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘डोमिनिका अवार्ड ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. डोमिनिका या देशाने सर्वोच्च सन्मान देत नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला आहे.
2021 मध्ये नरेंद्र मोदी यांनी डोमिनिका देशाची मदत केली होती. अॅस्ट्राझेनेका या कोरोना लसीचे 70 हजार डोस भारताने डोमिनिका देशाला दिले होते. कठीण काळात भारताने केलेली मदत लक्षात घेत डोमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला आहे.जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत होतं. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांची मदत केली. कोरोनाशी लढा देण्यासाठी लागणारी साधनसामग्री पुरवली होती. कोरोना लस आणि औषधं पुरवली होती.
कोरोनाकाळातील मदतीला डोळ्यासमोर ठेवून सन्मान करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. हा केवळ माझा एकट्याच्या सन्मान नाही. तर हा 140 कोटी भारतीय नागरिकांचा सन्मान आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारतातील करोडो लोकांच्या संस्कार आणि परंपरेचा हा सन्मान आहे. भारत आणि डोमिनिका हे दोन देश महिला सशक्तीकरणाचं रोल मॉडेल आहे, असं मोदी म्हणाले. डोमिनिकाच्या आधी नायझेरिया देशाने देखील त्यांचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रॅड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नाइझर’ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला होता.





