Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

चाकणकर अजून पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रुपात अडकलेत? प्रकाश महाजनांचा सवाल

Prakash Mahajan | महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरून प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मृत महिला डॉक्टरचं चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रुपात अडकलेत, की कारवाई करू शकत नाहीत? असा थेट सवाल महाजन यांनी केला.

रुपाली चाकणकरांनी त्या मृत महिलेचे चारित्र्यहनन केल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलं. ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. एवढं होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रुपात अडकलेत? मुख्यमंत्री फडणवीस हे रणजीतसिंह निंबाळकर यांना कशी काय क्लीनचीट देऊ शकतात? चौकशीत ते जर निर्दोष असतील तर हरकत नाही. अशा प्रकारची माणसं तुमच्या भोवती गोळा होत असतील तर पक्ष बदनाम होणारच, असं महाजन म्हणाले.

हेही वाचा      :          “मराठी आई मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे”; आमदार प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य 

जयकुमार गोरे यांनीही मृत महिलेच्या चॅटिंगवर भाष्य करत तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे यांचं लोकांनी काय काय दाखवलं नाही? ज्या महिलेला एक कोटी रुपये देताना ट्रॅप करण्यात आलं ते एक कोटी गोरेंकडे कसे आले हे ईडीने त्यांना विचारलं. त्यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार. हे कोणीही मूळ भाजपचे नाहीत, ते बाहेरून आले आहेत, त्यांनी बाहेरून येताना हा रोग आणला. राज्याचा एक मंत्री असं कसं काय बोलू शकतो? समजा त्या महिलेची चॅटिंग असेल तर तुम्ही काय तिला आत्महत्या करायला लावणार का? असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button