Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

Political Battle : “लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दिसला”; जम्मूच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

जम्मू कश्मीर निवडणूक : ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील ही निवडणूक फार महत्त्वाची होती. कलम ३७० आणि ३५ ए रद्द झाल्यानंतरचही ही पहिलीच निवडणूक होती. यामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दिसून आला. जम्मू काश्मीरातील प्रत्येक मतदाराची मी प्रशंसा करतो. जम्मू काश्मीरमधील भाजपाच्या प्रयत्नांचा मला अभिमान आहे. आमच्या पक्षाला मत देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात मतदान झाले. दरम्यान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर झाले. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक पार पडली असून ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. निकालाआधी जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीच्या बाजुने कौल देण्यात आला होता, तर भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले आहेत.

राज्यात नॅशनल कॉन्फरन्सने ४२ व काँग्रेसने ६ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांच्या आघाडीने बहुमत मिळवलं असून हे पक्ष लवकरच सत्तास्थापन करणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असं पक्षाचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी जाहीर केलं आहे.

भाजपाच्या जम्मू-काश्मीरमधील एकमेव महिला उमेदवार शगुन परिहार यांनी किश्तवार मतदारसंघातून विजय मिळवला आहे. परिहार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सज्जाद अहमद किचलू यांचा ५२१ मतांनी पराभव केला आहे. पाच वर्षांपूर्वी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात परिहार यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.

‘आप’ने खाते उघडले…
डोडा (पूर्व) विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे उमेदवार मेहराज मलिक यांनी विजय मिळवला आहे. मेहराज यांच्यामुळे आपने जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये खातं उघडलं आहे. मलिक यांनी या मतदारसंघात भाजपा, काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीवर मात केली आहे. मलिक यांना २३,२२८ मतं मिळवली आहेत.

आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू : मेहबुबा मुफ्ती
२०१४ च्या निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये भाजपाबरोबर सत्तास्थापन करणाऱ्या पीडीपीची यंदाच्या निवडणुकीत जबरदस्त पिछेहाट झाली आहे. त्यानंतर पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या की ‘‘आम्ही एक मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावू’’. पीडीपीने कुपवाडा व पुलवामा या दोन जागा जिंकल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button