‘१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन भाजपा रडीचा डाव खेळत आहे’; सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule | विधानसभा निवडणुकीत भाजप रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १६३ जागांवरील अपक्ष उमेदवारांना निवडणुकीसाठी ‘पिपाणी’ चिन्ह देऊन भाजप रडीचा डाव खेळत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. देऊन भाजप रडीचा डाव खेळत आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, की विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १६३ जागांवरील अपक्ष उमेदवारांना निवडणुकीसाठी ‘पिपाणी’ चिन्ह देऊन भाजप रडीचा डाव खेळत आहे. निवडणूक आयोगाने चिन्हाच्या नावामध्ये अपेक्षित बदल न केल्यामुळे साताऱ्यामध्ये युतीचा उमेदवार विजयी झाला, याची कबुली स्वत: अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप रडीचा डाव खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘एमएस धोनी’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाइन होत नाही, याची कल्पना आहे. त्यामुळेच भाजप त्यांच्यावर टीका करत आहे. मात्र, पवार यांच्यावर टीका करून महागाईचा प्रश्न सुटणार नाही. भाजपकडे सांगण्यासारखे काही नाही, त्यामुळे ते पवार यांच्यावर टीका करत आहेत. बारामतीमध्ये दादा कोण, हे बारामतीची जनता ठरवेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.