ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘पीएमपी’कडून भाडेवाढ विचाराधीन!

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेवर संचलन तुटीचा भार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कंपनीच्या संचलन तुटीमध्ये दरवर्षी वाढ होत असल्याने ती भरून काढण्यासाठी तिकीटदरात वाढ करण्याचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय नवीन पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतरच घेतला जाणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेच्या हद्दीसह पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये पीएमपीएमएलकडून बससेवा पुरविली जाते. त्यामुळे बसच्या खर्चाचा भार पीएमआरडीएनेही उचलावा, असा निर्णय तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानंतर शासनाच्या नगरविकास विभागाने पीएमआरडीएच्या हिश्याचे 118 कोटी रुपये एकदाच भरले. त्यानंतर पीएमपीएमएलने संचलन तुटीपोटी पीएमआरडीएकडे 222 कोटींची मागणी केली.

मात्र, ही रक्कम भरली जात नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेवर संचलन तुटीचा भार पडत आहे. पीएमपीएमएल बसचे तिकीट दर 2016 मध्ये वाढविण्यात आले होते. त्यानंतर गेली आठ वर्षे वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही महापालिका प्रशासनाने बसच्या तिकीटदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय नवीन पालकमंत्र्यांसमवेत बैठक झाल्यानंतरच घेण्यात येणार असल्याचे वरीष्ठ अधिकार्‍यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.

‘डबल डेकर’ ई-बस सेवा कधी?
दरम्यान, पीएमपीने घोषणा केलेल्या डबल डेकर बस पुण्यात कधी धावणार, आम्हाला त्या बसमध्ये बसून प्रवास कधी करता येणार, असा सवाल पुणेकर प्रवाशांकडून केला जात आहे. तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत ‘डबल डेकर’ ई-बस खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘डबल डेकर’ खरेदीला पीएमपीच्या संचालक मंडळाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता दोन्ही महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर डबल डेकर बस शहरात आणाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

डबल डेकरचे फायदे…
इलेक्ट्रिक असल्याने प्रदूषण रोखण्यास मदत
इंधनाची बचत; एसीमुळे थंडगार प्रवास
एकाच बसमधून दोन बसच्या
क्षमतेच्या प्रवाशांची वाहतूक शक्य
उत्पन्नात होणार वाढ
प्रवाशांचे थांब्यांवरील वेटिंग कमी होणार
शहराच्या विकासात भर पडणार

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button