आमिर खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; पहिला चित्रपट OTT वर होणार रिलीज

Maharaj OTT | बॉलिवूडचा “मिस्टर परफेक्शनिस्ट” अभिनेता आमिर खान याचा लेक जुनैद खान आता सिनेइंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील चार वर्षांपासून जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी मेहनत घेत होता.
जुनैद हा ‘महाराज’ या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे. ‘महाराज’ हा चित्रपट १४ जून रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट १८६२ मधील एका घटनेवर आधारीत गोष्ट आहे. पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्यावर आधारीत आहे.
हेही वाचा – ..अन्यथा पावसाचा चिखल क्षेत्रीय कार्यालयासमोर टाकणार!
https://www.instagram.com/p/C7ihvNvSo28/
‘महाराज’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. आता जुनैद रुपेरी पडद्यावर अभिनेते जयदीप अहलावत यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.





