छत्रपती शिवरायांच्या ‘या’ १२ किल्ल्यांची जागतिक स्तरावर दखल घेणार

Chhatrapati Shivaji Maharaj Fort | छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना आता जागतिक दर्जा मिळू शकतो. यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसला रवाना झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना वारसिक दर्जा मिळावा यासाठी शिवप्रेमी प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे आता गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा देखील जगासमोर येईल.
हेही वाचा : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (मराठा मिलीटरी लँडस्केप ऑफ इंडिया) या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.