Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राणेंवरील टीकेनंतर नितेश राणेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले, तुमच्या पार्थला..

यावेळी माझा मित्र पार्थ ला निवडून आणा..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा नारायण राणे यांच्यावर टीका करतानाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी भाजपनेते नारायण राणेंनी शिवसेना फोडली त्यानंतर ते दोनदा निवडणूकीत पराभूत झाले, एकदा तर एका महिलेने त्यांना पाडलं अशी टीका अजित पवार यांनी केली. दरम्यान यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नितेश राणेंनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. अजित दादा मोठे नेते.. पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा.. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे.. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले.. शाम सावंत सोडून.. माहिती असुदे दादा.., असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. तसेच बस यावेळी माझा मित्र पार्थ ला निवडून आणा.., असा टोला देखील नितेश राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.

गेल्या वेळी बिचारा..एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला..म्हणून ते काही होत का बा..राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री..मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले..आपण काय फक्त भावी मुख्यमंत्री च्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात..तुमचा आवडता टिल्लु, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button