फडणवीसांवरील टीकेनंतर निलेश राणेंचं टीकास्त्र; म्हणाले, ठाकरे कुटुंबाचा सत्यानाश..
सुशात सिंग राजपूत, दिशा सलियान प्रकरणावरून आरोप

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाली असल्याची टीका केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मी फडतूस नव्हे तर काडतूस आहे, असं प्रत्युत्तर दिलं आहे. याचदरम्यान, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
निलेश राणे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण, दिशा सलियानाम मृत्यू प्रकरण, सपना पाटणकर प्रकरण, अलिबाग प्लॉट, मुंबईचं वाटोळं इत्यादी, अशी उद्धव ठाकरे आणि कुटुंबाच्या फजतुसपणाची यादी मोठी आहे. या ठळक विषयांवर लक्ष दिले तर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा सत्यानाश होईल.
सुशात सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी, तसेच दिशा सलियान मृत्यू प्रकरणात राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. यावरून राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं आहे.





