शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा सवाल
![Narayan Rane said what is Shankaracharya's contribution to Hinduism](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Narayan-Rane-780x470.jpg)
मुंबई | अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. मात्र, या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चार शंकराचार्यांनी नकार दिला आहे. यावर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी कोणते योगदान दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नारायण राणे म्हणाले, राम मंदिर एवढ्या वर्षांनंतर होत आहे, त्याचं कौतूक नाही. हा विषय आतापर्यंत कोणी घेतला नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भाजपानी हा विषय हाती घेतला. शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी? शंकराचार्य हे आमच्या भाजपाला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत.
हेही वाचा – राष्ट्रवादीची शरद पवार टीम ॲक्टिव्ह; शहरात होणार “भव्य जिल्हास्तरीय डान्स” स्पर्धा
राम मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नसून धार्मिक दृष्टिकोनातून होत आहे. राम आमचा दैवत आहे. त्यासाठी मंदिर उभारलं जातंय. शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातलं हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं, जे योगदान रामानी दिलं, असंही नारायण राणे म्हणाले.