‘नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत; अंगावर केसेस, भानगडी अन्….; गोगावलेंचे खळबळजनक विधान

Bharat Gogawale : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याची बैठक कुडाळ पावशी येथे पार पडली. या बैठकीत शिवेसनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कार्यकर्ता मेळाव्यातील भाषणादरम्यान गोगावेले यांनी नारायण राणे यांना जवळून पाहिलं आहे. त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, मर्डर वैगरे सगळं झालं असे खळबळजक विधान केले आहे. हे विधान गोगावले यांनी चक्क नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्यासमोरच केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचवल्या आहेत.
सिंधूदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं. वेगळं सांगायची आवश्यकता नाही, असे भरत गोगावले म्हणाले. निलेश राणेंच्या रुपाने सिंधूदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे, असे गोगावले म्हणाले आहेत.
हेही वाचा – ‘माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न…..; अजित पवारांनी सांगितला लग्नाआधीचा ‘तो’ किस्सा
कोकणात आज आपला पक्ष नंबर एक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना अत्यंत सावध रहावे लागते. तुम्हाला लागेल ती ताकद देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. केसरकर साहेब भानगडी करणारे नाहीत. ज्याने भानगड केली नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी दिपक केसकर यांना मिश्किल टोला लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आतापासून राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवर निवडणुकीत सगळीकडे महायुती म्हणून जुळेल असे नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे दोन तर भाजपचा एक आमदार आहे, आम्हाला समजून घेतले तर आम्ही समजून घेऊ, असे म्हणत गोगावले यांनी अप्रत्यक्षपणे जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा एक आणि आमचे दोन आमदार आहेत, असे देखील गोगावले म्हणाले.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्यापर्यंत मटलेला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून पालकमंत्रीपदासाठी दावा केला जात आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावले आग्रही आहेत. पुन्हा एकदा त्यांनी पालकमंत्री पण होऊ, आम्ही काम करतोय त्याचा मोबदला मागतोय असे म्हणत पालकमंत्री पदावर दावा केला आहे. आम्ही गरिबांचे शेठ आहोत, आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे, असे देखील ते म्हणाले.