नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या मुंबईतील कार्यालयाचे आज उद्घाटन
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह प्रमुख नेते मुंबईत : खासदार डॉ. अमोल कोल्हे राजीनामा देणार!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटाचे नवीन कार्यालय मुंबईत सुरू करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या समोरच हे कार्यालय असून, आज त्याचे लोकार्पण होणार आहे. त्यासाठी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारपदाचा राजीनामा देणार असल्याचे घोषित केले आहे. अजित पवार यांचा शपथविधी झाला. त्यावेळी खासदार कोल्हे उपस्थित होते. मात्र, त्यानंतर आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचा खुलासा डॉ. कोल्हे यांनी केला आहे.
नोशनलिस्ट पार्टीला मला हटवण्याचा अधिकार नाही : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पदावरुन हटवण्यात आले. मात्र, ‘‘मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे जी मंडळी पक्षातून बाहेर गेली. त्यांनी मला पदावरुन हटवण्याचा प्रश्नच नाही.’’ असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.





