मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक स्थगित! ठाकरे विरूद्ध ठाकरे सामना लांबला

मुंबई : मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री उशीरा यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या समोर राज पुत्र अमित ठाकरेंशी सामना पाहायला मिळणार आहे.
मुंबई विद्यापीठातील १० सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. एक आठवड्यापूर्वी म्हणजेच ९ ऑगस्टला यासंदर्भात कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. १८ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. पुढच्या महिन्यात १० सप्टेंबर रोजी मतदान तर १३ सप्टेंबरला निकाल जाहीर होणार होता. जवळपास ९५ हजार तरुण मतदान या निवडणुकीसाठी मतदान करणार होते. मात्र ही निवडणुक सध्या स्थगित करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘मी पुन्हा येईन’वरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला; म्हणाले..
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली!
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.
आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.
निषेध !
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 17, 2023
मुंबई विद्यापीठानं जारी केलेल्या परिपत्रकात काय म्हटलं?
१७ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य शासनाकडून आलेल्या पत्रातील निर्देशांनुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं मुंबई विद्यापीठ प्रशासन समितीनं म्हटलं आहे. त्यामुळे पुढील आदेशांपर्यंत निवडणूक स्थगित करण्यात येत असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे.





