Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उत्साहात

मोशी प्राधिकरण संत नगर येथे नागरिकांनी उत्साहाने ऐकले पंतप्रधानांचे मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पिंपरी-चिंचवड शहरातील महापौर रवी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

मोशी प्राधिकरण संत नगर येथे झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय तसेच राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे विचार मांडले. उपस्थित नागरिकांनी कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकून देशहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा –   प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कृषी परिवर्तनाचा नवा अध्याय; ‘एआय ॲग्री २०२६ परिषदेत जागतिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाचे सरचिटणीस हनुमंत अण्णा लांडगे, मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे, उपाध्यक्ष संदीप भाऊ कुंभार, तसेच नवीन कुमार आहेर, अश्विन कुमार बाबर, पोपटराव उगले, बाळासाहेब दाते, अरुण इंगळे, अनिल जगताप, आमरेट चॅरिटेबल ट्रस्ट चे तरुण सहकारी व परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्ष, धावडे वस्ती, इंद्रायणी नगर, नेहरू नगर मंडलच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी ‘मन की बात’ या प्रेरणादायी कार्यक्रमातून घेतलेल्या संदेशाला त्यांच्या दैनंदिन जीवनात अमलात आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात नागरिकांचा उत्साह पाहून अभिमान वाटतो. प्रत्येक नागरिकाने देशहिताच्या कामात सहभागी होणे गरजेचे आहे, आणि आजचा कार्यक्रम त्यासाठी प्रेरणादायी ठरला.”

— रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button