मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी शास्त्रींच्या भूमिकेवर सवाल
निर्घृण हत्या करणाऱ्यांची पाठराखण केली का? मात्र त्यानंतर नामदेव शास्त्री सानपांची भूमिका बदलल्याचे पाहायला मिळाली

पुणे : मीडियाने संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही? असं वक्तव्य करणाऱ्या नामदेव शास्त्री सानपांवर सोशल मीडियावर चौफेर टीका झाली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका महंत पदावर असणाऱ्या व्यक्तीने अप्रत्यक्षपणे निर्घृण हत्या करणाऱ्यांची पाठराखण केली का? अशाही चर्चा रंगल्या. मात्र त्यानंतर नामदेव शास्त्री सानपांची भूमिका बदलल्याचे पाहायला मिळाली. यावरून वाल्याचा वाल्मिकी करणारे संत न्यू इंडियात आले की काय? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. नामदेव शास्त्री सानपांच्या अनेक भूमिका रंजक आहेत. ज्यावेळी त्यांना पंकजा मुंडेंवरील चिक्की घोटाळ्यांच्या आरोपांवेळी का पाठिंबा दिला नाही? त्यावर शास्त्री म्हणाले, तेव्हा पंकजा मुंडे माझ्याकडे आल्याच नाहीत. आता धनंजय मुंडे आलेत म्हणून त्यांनी मी पाठिंबा दिला.
हेही वाचा – १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? बजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत
त्यावर प्रतिसवाल करताना मग उद्या वाल्मिक कराड आला तर पाठिंबा द्याल का? त्यावर शास्त्री म्हणाले, ‘कराड नेता नाही, नेते महान आणि मेहनती असतात. आपण फक्त नेत्यांबद्दल बोलतोय.’ तर २०१६ ला भगवानगडावर राजकारण नको म्हणून नामदेव शास्त्री सानपांनी पंकजा मुंडे यांना विरोध केला होता. त्यावरून मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी शास्त्रींच्या भूमिकेवर सवाल केलेत.