मिशन- PMCM : राज्याचे CM फडणवीस यांच्याकडून MLA महेश लांडगे यांची पाठराखण!
अपना काम बोलता है : पण, 25 वर्षांत काही केले सांगता येत नाही, म्हणून आपल्यावर आरोप
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । ‘‘पिंपरी-चिंचवड शहरात 25 वर्षे सत्तेत असताना काय केले? हे सांगता येत नाही. त्यामुळे समोरच्या पक्षातील लोक आपल्यावर आरोप करीत आहेत. त्यामुळे त्रागा- संताप करुन घ्यायचा नाही. ‘‘अपना काम बोलता है’’ आपण केलेली कामे लोकांना सांगायची, जनता आपल्या सोबत आहे. काळजी करु नका, ’’ अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांची पाठराखण केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा तगडा सामना रंगला आहे. आज आकुर्डी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचार सभा झाली. यामध्ये त्यांनी विकासाच्या मुद्यांवर सविस्तर भाष्य केले.
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर किंबहुना आमदार महेश लांडगे यांच्यावर अनेक आरोप केले. त्यामुळे राजकारण पेटले आणि पिंपरीतील जाहीर सभेत महेश लांडगे यांनी त्यांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले.
महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर भाषण करताना यावर लक्ष वेधले आणि ‘‘महायुतीमधील नेत्यांचा आदर फक्त भाजपाच्या कार्यकर्त्यांच ठेवायचा का?’’ असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला. सातत्त्याने आमच्यावर आरोप करुन भाजपाला बदनाम केले जात आहे, याबाबत लक्ष घाला, अशी विनंतीसुद्धा केली.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्मिक शब्दांत उत्तर दिले. किंबहुना, महेश लांडगे यांच्यासाठी खास शेर बोलून दाखवला. CM फडणवीस म्हणाले की, ‘‘परिंदे को मिलेगी मंजील एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते है । और वहीं लोग रहतें है खामोश अक्सर जमानें में उनके हुनर बोलते है।’’ आपलं काम बोलतंय… आणि त्यामुळेच या समोरच्या लोकांचा वैताग आहे. त्रागा आहे. ते रागवले म्हणून तुम्ही रागावू नका. समोरच्या लोकांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात. त्याला त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे निवडणुकीत वादावादी झाली पाहिजे. सवाल-जवाब झाला पाहिजे, अशी त्यांनी अपेक्षा आहे. आपण केलेले काम सांगितले, तर कुणालाही उत्तर देण्याची वेळ येणार नाही. मागच्यापेक्षा जास्त जागा भाजपाच्या निवडून येतील. ’’





