महापालिका प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मिशन-PCMC : हरी ओम सोसायटी, दिघी–भोसरी रोड येथे उमेदवारांचे जंगी स्वागत

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून हरी ओम सोसायटी, दिघी–भोसरी रोड परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अ प्रवर्गातील उमेदवार विराज लांडे यांच्यासह ब, क आणि ड प्रवर्गातील उमेदवारांनी सोसायटी परिसरात भेटीगाठी घेत नागरिकांशी थेट संवाद साधला.
या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसेच परिसरातील विविध मूलभूत प्रश्न नागरिकांनी उमेदवारांसमोर मांडले.
हेही वाचा – प्रभाग क्रमांक ४ दिघी-बोपखेलमध्ये भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार
विराज लांडे, अनुराधा लांडगे, अश्विनी फुगे आणि अमोल डोळस यांनी नागरिकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे व माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात सुरू असलेल्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग सातमध्ये विजयासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभाग क्रमांक सातमधील प्रत्येक नागरिकाचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधा या प्रश्नांवर प्राधान्याने काम करून प्रभागाचा सर्वांगीण आणि संतुलित विकास साधण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या सोबत उभे राहू.”
— विराज विश्वनाथ लांडे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रभाग क्रमांक ७.





