Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

Mission Assembly Election: चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आमदार अश्विनी जगताप मैदानात!

मतदार संघात प्रभागनिहाय बैठक अन्‌ भेटीगाठींचे नियोजन

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आता आमदार अश्विनी जगताप मैदानात उतरल्या आहेत. प्रभाग निहाय भेटी-गाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राजकीय खलबत सुरू होती. मात्र, आमदार अश्विनी जगताप यांनीच पक्षश्रेष्ठींकडे शंकर जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस केली. त्यामुळे भाजपाच्या पहिल्या यादीतच शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा झाली होती.

दरम्यान, आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवड मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली आहे. चिंचवडमधील भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि भाजपा परिवारातील सहकाऱ्यांच्या मदतीने भेटी-गाठी आणि संवाद कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

शंकर जगताप यांची प्रचारात आघाडी…

महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची निश्चिती झालेली नाही. मात्र, चिंचवडमध्ये सध्या शंकर जगताप यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसत आहे. शंकर जगताप यांनी उमेदवारी जाहीर होताच नवी सांगवी परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी आणि बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जगताप यांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन नागरिकांचा आशीर्वाद घेतला. ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी औक्षण करून तर नागरिकांनी फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘अब की बार, शंकरभाऊ आमदार’ अशा घोषणा देत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वास, यावेळी जगताप यांना दिला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button