माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक; अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती : बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज, २२ जून २०२५ रोजी मतदान पार पडत आहे. एकूण १९,६५१ मतदार असलेल्या या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे.
हेही वाचा – ओढे- नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थिती; संबंधितांवर होणार कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी श्री शंभुसिह महाराज हायस्कूल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे देखील मतदानासाठी दाखल झाले होते. सुप्रिया सुळे यांनी रंजन तावरे यांना शुभेच्छा दिल्या. रंजन तावरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.