Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘सचिन पिळगांवकरांनी डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी हे पचनी पडतच नाही; जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : मराठी सिनेसृष्टीचे महागुरू म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत ‘शोले’ चित्रपटातील “कितने आदमी थे…” हा प्रसिद्ध डायलॉग अमजद खान यांना व्यवस्थित बोलता येत नसल्याचे सांगितले होते. अमजद खान ज्यावेळी डायलॉग बोलत होते, तेव्हा तो पातळ आवाजात ऐकू येत होता. याची जाणीव झाल्यानंतर सचिन पिळगांवकर यांनी अमजद खान यांना स्टुडिओत नेलं आणि त्यांच्या आवाजातच पुन्हा तो डायलॉग बोलून घेतल्याचे त्यांनी म्हटले. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत सचिन पिळगांवकर यांच्यावर निशाणा साधलाय.

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की, शोले हा सिनेमा 1975 साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक-एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता. डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल.

हेही वाचा –  माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक; अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Image

गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की,  गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य-आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगांवकर यांनी शिकवले. कारण, अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील 1950-60 च्या दशकातील नामांकित अभिनेते होते. म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगांवकर याने संवादफेक किंवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही. आज अमजद खान आपल्यात नाहीत. आजही जो कोणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंगला विसरूच शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सचिन पिळगांवकर यांनी मुलाखतीत म्हटले होते की, शोले सिनेमा आल्यानंतर अनेकांना असं वाटलं की, अमजदचा आवाज हा गब्बर सिंहचा आवाज वाटत नाहीय. तो थोडासा पातळ वाटतोय. त्याला मी माईकसमोर उभं केलं आणि आमचे सूद नावाचे तेव्हा रेकॉर्डिस्ट होते, असिस्टंट होते ते मंगेश देसाईंचे. त्यांना सांगितलं ट्रेबल एकदम बंद करदो और बेस बढादो. मी अमजदला सांगितलं माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल. कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता आणि पहिला डायलॉग “कितने आदमी थे…” आधी त्यानं वरच्या पट्टीत ओरडून म्हटलेलं. मी त्याला सांगितलं नाही, असं नाही. नीचे के सूर मे बोल. पट्टी पुरी नीचे कर. Because I Am A Singer Also. मला ऑक्टिम्स कळतात. त्यामुळे खालच्या सुरात बोल, कितने आदमी थे…”, असं सचिन पिळगांवकर म्हणाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button