दहावं आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना अनेक कावळे फिरतात; शिंदे गटातील आमदाराची शरद पवारांवर टीका

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचे सातारमधील कोरेगाव मतदार संघात दौरे वाढले आहेत. या दौऱ्यावरून कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. दहावं आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना अनेक कावळे फिरतात. त्याने काही फरक पडत नाही, अशी टीका त्यांनी केली.
शरद पवार यांनी जिहे कटापूर जोजनेवर भाष्य करत मी या योजनेबाबत तीन महिन्यांनी बोलेन असं सांगितलं होतं. यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे संकेत दिले होते. यावर महेश शिंदे यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी इंडिया आघाडीचे सरकार येण्याबाबत भाष्य केले होते. मात्र त्यांनी काही ही सांगितले तरी जिहे कटापूर योजना दीड वर्षांपूर्वीच पूर्ण होवून तिचे पाणी सर्वत्र पोहचले आहे. आता विस्तारी जिहे कटापूर योजना करायची आहे. मात्र या योजनेच्या पूर्ण नावाचा उल्लेख शरद पवार यांनी टाळला.
हेही वाचा – ‘मी माझ्या अटकेची वाट पाहतोय’; अनिल देशमखांचं खळबळजनक विधान
नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्षमणराव इनामदार उपसा सिंचन जिहे कटापूर योजना असे या योजनेस नाव आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान सिंचाई योजनेत या योजनेचा समावेश केला आहे. हे शरद पवार यांना माहीत नाही? ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असं महेश शिंदे म्हणाले.
माण खटावच्या दुष्काळाचे फक्त राजकारणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केले आहे. ही योजना राज्य सरकारच्या हातात नाही. केंद्राकडे आहे. तसेच त्यांच्या पक्षाच्या स्थानिक उमेदवाराला याचा आभ्यास नाही. त्यामुळे ते नेत्याला काय समजवून सांगणार? असा टोलाही महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना लगावला.





