Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

सुनील शेळकेंचा भाजपला मोठा धक्का!

महाविकास आघाडीचा १८ जागांपैकी १७ जागांवर विजय

पिंपरी : पुणे जिल्ह्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने १८ जागांपैकी १७ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजप-शिंदे गटाच्या युतीला मोठा धक्का बसला आहे. युतीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

मावळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपाचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी प्रतिष्ठा पणाला लागली होती. आज या निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीने मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे.

राष्ट्रावादीला १५, काँग्रेसला २ आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीला १ जागेवर विजय मिळाला आहे.

राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मावळमध्ये केलेल्या विकास कामामुळेच हा विजय मिळाला असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button