उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

Jagdeep Dhankhar Resigns : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, 21 जुलै 2025 रोजी, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 67(अ) अंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’
काय लिहिले पत्रात?
आदरणीय राष्ट्रपती महोदय,
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आरोग्याच्या कारणास्तव मी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ६७ (अ) अन्वये भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.
माझ्या कार्यकाळात आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सौहार्दपूर्ण सहकार्याबद्दल मी आपल्या – भारताच्या माननीय राष्ट्रपती यांचे मन:पूर्वक आभार मानतो. मी माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मान्यवरांचेही मन:पूर्वक आभार मानतो. पंतप्रधानांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मला लाभले असून, या काळात मी अनेक गोष्टी शिकल्या.
सर्व माननीय खासदारांकडून मिळालेल्या प्रेम, विश्वास आणि आपुलकीसाठी मी कायम ऋणी राहील. ही भावना माझ्या स्मृतीत सदैव कोरली जाईल. उपराष्ट्रपती या पदावर कार्यरत असताना मला मिळालेल्या अमूल्य अनुभवांसाठी आणि ज्ञानासाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे. आपल्या महान लोकशाहीत ही एक मोठी संधी होती.
भारताच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचा मी साक्षीदार झालो, ही माझ्यासाठी गौरवाची आणि समाधानाची बाब आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील या संक्रमणकालीन पर्वात सेवा करण्याची संधी मिळणं, हे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाचं होतं. मी या सन्माननीय पदावरून निवृत्त होत असताना, भारताच्या जागतिक पातळीवरील डंका आणि अद्वितीय यशाबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतो आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझा पूर्ण विश्वास कायम आहे. आपले मन:पूर्वक आभार मानतो
भारताच्या प्रगतीबद्दल अभिमान
धनखड यांनी आपल्या पत्रात भारताच्या जागतिक पातळीवरील यश आणि विकासाचा उल्लेख करताना या संक्रमणकालीन काळात सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी उपराष्ट्रपती पदावर मिळालेल्या अनुभवांचे आणि खासदारांच्या सहकार्याचे कौतुक केले. हा राजीनामा देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.





