Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
कंडका पडला! राजाराम कारखाना निवडणूक निकालात महाडिक गटाची आघाडी
महादेवराव महाडिकांचा संस्था गटातून विजय

कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी मतमोजणी सुरू आहे. यामध्ये पहिल्या विजयाची नोंद सत्तारूढ गटाने केली आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून विजय मिळवला आहे. तर सतेज पाटील यांच्या समर्थकाचा ३९ मताच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
राजाराम कारखान्याची निवडणुक महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून लढवली होती. मतदानादिवशी त्यांनी ९० संस्था प्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. तर सतेज पाटील यांनी आपल्यासोबत ७५ संस्था प्रतिनिधी असल्याचे सांगितले होते. दोघांनी केलेल्या दाव्यापेक्षा प्रत्यक्षात कमी मते मिळाली आहेत. मात्र यामध्ये महाडिक यांनी बाजी मारली आहे.
निकाल याप्रमाणे :
महादेव महाडिक : ८३
सचिन पाटील : ४४





