‘तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे शरद पवार यांच्या घरचे आयुक्त’; किरीट सोमय्यांचा आरोप
उद्धव ठाकरे यांच्या या गुंडांवर लवकरच कारवाई होणार
![Kirit Somayya said that Police Commissioner Amitabh Gupta is Sharad Pawar's house commissioner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/sharad-pawar-and-Kirit-Somaiya-780x470.jpg)
पुणे : पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे शरद पवार यांच्या घरचे आयुक्त होते. तर राकेश बावधान यांना पळवल आहे. त्यांच्याच निगराणीमध्ये माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
पुणे महापालिकेच्या आवारामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांच्या वतीने हल्ला करण्यात आला होत. त्यावेळेस तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून कोणताही तपास करण्यात आलं नव्हता. आता या प्रकरणाची विस्तृत माहिती देण्यासाठी किरीट सोमय्या यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले की, गेल्या काही महिन्यांमध्ये या तपासात बऱ्या पैकी प्रगती झाली आहे.आत्ता पर्यंत उद्धव ठाकरे सेनेच्या २८ गुंडांची ओळख पटली आहे. आणखी ७ आरोपींना पोलिस शोधत आहे. उद्धव ठाकरे यांच्या या गुंडांवर लवकरच कारवाई होणार आहे.