Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अमित शाह यांच्या भेटीच्या बातम्यांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले..

मुंबई : केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटनासाठी गृहमंत्री अमित शाह पुण्यात आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट झाल्याच्या बातम्या येत आहेत. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, रोज सकाळी उठून स्पष्टीकरण देण्याचा उद्योग सुरू केला आहे का? तुम्ही बातम्या तयार केल्यात, तर तुम्हीच त्या बंद करा. मी कुठे आणि का गेलो? याचे पुरावे दिसले किंवा माहिती मिळाली, तर बातम्या करा. एखाद्याबद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू झाला, तर हे बरोबर नाही. पण, सकाळपासून बातम्या पाहून माझी करमणूक होत आहे.

हेही वाचा – पुणे तिथे काय उणे! हात दाखवून थांबवली मेट्रो, व्हिडीओ व्हायरल 

अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसार मी आणि माझ्याबरोबरचा एक सहकारी रात्री दोनपर्यंत घरीच बसलो होतो. मग पुण्याला कधी गेलो? काल संध्याकाळी आणि आज सकाळी मी शरद पवारांच्या घरीच होतो. मग मी कधी अमित शाहांना भेटलो? याचं संशोधन करा, कुठे जायचं असेल, तर भेटून सांगेन. पण, विनाकारण बातम्या चालवल्या जातात. मी आहे इथेच आहे. प्रसारमाध्यचं इकडे जाणार, तिकडे जाणार असल्याचं सांगतात, असंही जयंत पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button