ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागतिक महिला दिन साजरा करून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान

विविध क्षेत्रातील रणरागिणींचा पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने केला सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकारांकडून रणरागिणींचा गौरव

चिंचवड | प्रतिनिधी

जागतिक महिला दिन हा आठ मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. तसेच मार्च महिन्यात वेगवगेळ्या तारखांना देखील साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क येथे दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड पत्रकार संचाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्याच्या भावना यावेळी डिजिटल मिडिया परिषदेचे शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी व्यक्त केल्या.

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या या सोहळ्यांमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार – डॉ. किशोरी आपटे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार – सुप्रिया सचिन मंडलिक, त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार – सुभद्रा आत्माराम मोकाशे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार – स्वरांजली माने, पशुवैद्यकीय सेवारत्न पुरस्कार – डॉ. पूजा बोंबले, पिंपरी चिंचवड संस्कारत्न पुरस्कार – भारतीय न्यायाधीश, पिंपरी चिंचवड कलारत्न – ज्योती भीमाशंकर सेतसंदी, पिंपरी चिंचवड सिनेरत्न पुरस्कार – कृत्तिका तुळसकर, आणि रुग्णसेवा विशेष सन्मान स्वाती कुलकर्णी, शोभा तळेकर, शोभा ढोले यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण १४ महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पद्मजा, मैत्री अपंग, समृद्धी, आई, श्रीकृष्ण, साई चरण, सुनिधी, आनंदी, साई, जीवन ज्योती, जास्वंदी, विघ्नहर्ता, रोहिणी आणि यशोदा महिला बचत गटांचा सन्मानचिन्ह व वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमिला सुनील आढाव (महिंद्र स्पेअर बिझनेस युनीट, कान्हे हेड ऑफ दी डिपार्टमेंट – डेटा एन्ट्री विभाग) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे आभार मानून – वाचन, अभ्यास, संशोधन ज्ञान, विज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्टर उभे केले जाणार असून या नवनिर्मितीत पुरुषांप्रमाणेच महिलांना संधी उपलब्ध करून देणार असल्याच्या भावना महापौर रविभाऊ लांडगे यांनी व्यक्त केल्या. तर आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून कर्तृत्ववान रणरागिणींचा सन्मान करता आला आणि महिलांसोबत विचारांची देवाणघेवाण करता आल्याचे, उप महापौर शर्मिलाताई बाबर यांनी समाधान व्यक्त केले. तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद समाज हितासाठी, पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत असताना परिषेदेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत महिला भगिनींचा केलेला सन्मान इतरांना प्रेरणादायी ठरत असल्याची भावना पत्रकार परिषेद विश्वस्त शरद पाबळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा      :        अभय योजनेला पिंपरी-चिंचवडकरांचा प्रतिसाद, मालमत्ता कर वसुली ९०० कोटी पार        

या सोहळ्यात शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय आदी क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह, शाल व झाडाचे रोप देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानित महिलांनीही आपल्या यशामागील संघर्ष व अनुभव शेअर करत इतर महिलांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रविभाऊ लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, मार्गदर्शक उपस्थिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषेद विश्वस्त शरद पाबळे, परिषेद उपाध्यक्ष गणेश मोकाशे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर मंचावर उपस्थित होते. तर परिषद जिल्हा पदाधिकारी चिराग फुलसुंदर, अनिल वडघुले, श्रीमती रेखा भेगडे, मारुती बानेवार, श्रीमती प्रज्ञा आबनावे, याच बरोबर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे व डिजिटल मिडियाचे शिलेदार डिजिटल मिडिया शहर उपाध्यक्ष संतोष गोतावळे, महावीर जाधव, अशोक कोकणे, रमेश साठे, अनंता इंगळे, अविनाश कांबीकर, डॉ. देवीदास शेलार, पराग डिंगणकर, संजीव सूर्यवंशी, माऊली भोसले, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, राकेश पगारे, जेष्ठ परिषेद सदस्य प्रकाश जमाले, किशोरअण्णा लष्करे, नरेश जीनवाला, श्रीमती अनुष्काताई, विजय न्यायाधीश, राहुल जाधव, इत्यादी पत्रकार उपस्थित होते. तसेच सन्मानार्थी निवड समितीमध्ये लिटिल सायंटिस्ट चे दत्तात्रय गिरमकर, निलेश बोराडे, आणि काव्य मित्रचे राजेंद्र सगर  उपस्थित होते. दरम्यान या सन्मान सोहळ्यामध्ये काव्य मैफिल संपन्न झाली. कवी प्रकाश गायकवाड, कवी देवेंद्र गावंडे, प्राध्यापिका कवयित्री सुषमा भालेराव यांनी उपस्थितांची मने जिंकणाऱ्या कविता सादर केल्या. काव्य संचालन राजेंद्र सगर यांनी केले. तर विजय चव्हाण व स्वाती चव्हाण यांनी मान्यवरांना कला कुसर दाखवत वैविध्यपूर्ण फेटे परिधान केले.

जागतिक महिला दिनानिमित्त योजित कर्तृत्ववान रणरागिणींच्या या उपक्रमामुळे समाजात महिलांच्या योगदानाची जाणीव अधिक दृढ होऊन महिलांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल मिडिया परिषद शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी केले तर आभार परिषेद सदस्य अनिल वडघुले यांनी मानले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button