breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे तिथे काय उणे! हात दाखवून थांबवली मेट्रो, व्हिडीओ व्हायरल

पुणे : पुणे हे नेहमी आगळ्यावेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. सध्या पुण्यातील असाच एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने नव्याने सुरू झालेल्या मेट्रोला हात दाखवून थांबवताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या विस्तारीत स्थानकांचे उद्घाटन केले आणि पुणे मेट्रो चर्चेत आली. या मेट्रोला पुणेकरांचा मोठा प्रतिसादही मिळताना पाहायला मिळत आहे. सध्या याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन व्यक्तींनी हात करून मेट्रो थांबवली आणि बसून गेले आहेत.

हेही वाचा – पायांत चांदीचे पैंजण का घालतात, तर त्यामागे आहे वैज्ञानिक कारण

एका व्यक्तीने मेट्रो स्थानकावर येते आणि ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन केबीनचे दाव वाजवते आणि त्याला दरवाजे उघडण्याची विनंती करतो. त्यानंतर मेट्रोचे दार उघडली जातात आणि व्यक्ती मेट्रोत बसतो. तर दुसरा व्यक्तीसुद्ध उशीर झाला असताना घाईघाईत निघालेल्या मेट्रोला हात करून दरवाजे उघडण्याची विनंती करतो आणि नंतर बसून प्रवास करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button